वेदगंगा नदी
वेदगंगा नदी वेदगंगा ही कोल्हापूर जिल्ह्यातली एक नदी आहे. या नदीचा उगम तांब्याचीवाडी येथे झाला आहे. या नदीवर पाटगांव येथे धरण बांधण्यात आले आहे.ही पंचगंगा नदीची उपनदी असून पुढे कृष्णेस मिळते. वेदगंगा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील कित्येक गावांना पाणी पुरवठा करते. या नदीचे पाणी जास्तीत जास्त शेती पिकविण्यासाठी आणि बरच गावांमध्ये पिण्यासाठी उपयोगी आहे. ही नदी अदमापुर पासून पुढे कर्नाटक मध्ये यमगर्णी, जत्राट, सिदनाळ, हूनरगी , ममदापूर ,भोज मधून पुढे बारवाड मध्ये दूधगंगा नदीला मिळते आणि तसच पुढे ती कृष्णा नदीमध्ये समावते.