Posts

Showing posts from July, 2020

मौनी विद्यापीठ गारगोटी ता. भुदरगड जि. कोल्हापूर

                  मौनी विद्यापीठ :  महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी (ता. भुदरगड) येथील विद्यापीठवजा शिक्षणसंस्था. स्थापना १९५२. मौनीबाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठास ‘मौनी विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले. विद्यापीठाचा कायदेशीर दर्जा या संस्थेस अजून देण्यात आलेला नाही. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी मौनी विद्यापीठाच्या उच्च शिक्षणसंस्था संलग्न आहेत. प्रारंभी ही संस्था ‘मौनी विद्यामंदीर’ नावाने ग्रामीण शाळेच्या स्वरूपात स्थापन झाली. ही संस्था स्थापन करण्याचे श्रेय प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर, गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्था कोल्हापूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे यांना दिले जाते                     शिक्षणातून विकास आणि विकासातून शिक्षण’ हे या संस्थेचे तत्त्व आहे.परिसराचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास, ग्रामीण पुनर्रचना हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. गरीब, होतकरू व दलितवर्गाच्या मुलामुलींच्या शिक्षणाची मोफत सोय विद्यापीठात उपलब्ध आहे. विद्यापी...

रांगणा किल्ला

रांगणा किल्ला : महाराष्ट्रातील शिवकालीन एक प्रसिद्ध किल्ला. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कुडाळ तालुक्यात, कोल्हापूरच्या नैऋत्येस सु. ७८ किमी. वर सह्याद्रीच्या पर्वतरांगांत आहे. याची उंची सस. सु. ८०० मी. असून याच्या तीन बाजूंस तुटलेला कडा आहे. त्याची लांबी १,६०० मी. असून रुंदी ९०० मी. आहे. त्याच्या पूर्वेच्या बाजूने या किल्ल्यावर जाता येते. यास कोल्हापूर, पाटगाव, तांब्याचीवाडी(भटवाडी )चिक्केवाडी या मार्गाने बसने जाता येते पण पावसाळ्यात हा मार्ग बंद पडतो. चिक्केवाडीहून रांगण्यास प्रायः चढ नाही. उलट सु. ७ मी. उतरल्यावर किल्ल्याचा माथा येतो. त्याचा तट अनघड दगडांनी बांधलेला होता. किल्ल्याला पूर्वेकडून एकामागून एक तीन दरवाजे व पश्चिमेस एक दरवाजा आहे. पाण्यासाठी माथ्यावर एक तलाव व दोन विहिरी आहेत. गडावर रांगणाई (महिषमर्दिनी), मारुती, महादेव यांची देवालये असून एका वाड्याचे जुने अवशेषही तेथे दिसतात. रांगणाईसमोर एक पडझड झालेली दीपमाळ आहे. शिवाजीनी पन्हाळ्याप्रमाणे हा किल्लाही १६५९ मध्ये हस्तगत करून त्याची डागडुजी केली. छ. शाहूंबरोबरच्या युद्धात महाराणी ताराबाईंनी याचा आश्रय घेतला होता...

मौनी महाराज

मौनी महाराज : (सु. सतरावे शतक). एक शिवकालीन महाराष्ट्रीय सत्पुरुष. पाटगाव येथे आल्यानंतर धर्ममार्तंडांच्या छळाला कंटाळून त्यांनी मौन धारण केले. त्यामुळे त्यांना ‘मौनी’ हे नाव मिळाले. त्यांना मौनी बाबा वा मौनी बुवा असेही म्हणत. ते उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या गावाहून आले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव (ता. भुदरगड) या गावी वास्तव्य करून राहिले. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळत नाही. त्यांच्या मठातील जीवनक्रम नाथपंथांपैकी अवधूत उपपंथाशी काहीसा मिळता-जुळता होता. गोसाव्यांच्या ‘गिरी’ नावाच्या पंथाशी त्यांचा संबंध असण्याचाही संभव आहे. ते कथाकीर्तनाच्या माध्यमांतून सर्वसामान्य लोकांना उपदेश करीत. त्यांच्या कीर्तनातून वेदवाणी व्यक्त होत असल्यामुळे धर्ममार्तंडांनी तुकारामांप्रमाणेच त्यांचा फार छळ केला. त्यांची तुकाराम व रामदास यांच्याशी ओळख होती शिवाजी महाराजांनी दक्षिणेच्या स्वारीवर जाण्यापूर्वी १६७६ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट घेतली होती शिवाजी महाराजांनी रायगडावर भरविलेल्या एका संतपरिषदेस ते उपस्थित होते इ. प्रकारची माहिती मिळते. शिवाजी महाराजांनी मौनी म...

छत्रपती शिवाजी महाराज

सिद्दाच्या गुहा

श्री भद्रकाली मंदिर

श्री मौनी महाराज हायस्कूल & जु. कॉलेज पाटगांव

पाटगांव धरण